LAKSHMIBAN AGRO TOURISM
लक्ष्मीबन एग्रो रिसॉर्ट हा महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या कृषी पर्यटन अंतर्गत मान्यता प्राप्त सर्व सुख सोयी युक्त असा नावाजलेला प्रकल्प आहे. लक्ष्मीबन मध्ये आपल्याला नैसर्गिक वातावरणात शेतातील घरे, घरगुती पद्धतीचे चवदार भोजन, विविध खेळ, संगीत, जलतरण तलाव अशा प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातात. नयनरम्य शेती परिसर, पवना नदी असा नैसर्गिक वारसा लाभलेल्या लक्ष्मीबनच्या सभोवताली रोपवाटिका व समृद्ध जंगल परिसर देखील आहे. आपण, आपले कुटुंब, मित्र परिवार यांच्या सोबत येथील शांत परिसरात राहण्याचाआनंद घेऊ शकता.