देशमुख एज्यूकेशनल टूर्स मार्फत पूर्व प्राथमिक शाळा ते माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते, विद्यार्थाना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, अहित्यासिक, सांस्कृतिक, त्याच बरोबर शहरातील विद्यार्थाना ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी , शेतीविषयक माहिती मिळावी या साठी पुणे, सातारा, अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील विविध कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रावर विदयार्थी सहलींचे आयोजन केले जाते, सहलींच्या माध्यमातून विविध प्रकारचे फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती, शेतीच्या विविध पीकपद्धती, शेतीला पाणी देण्याच्या विविध पद्धती, व शेतीवर आधारित इतर जोड व्यवसाय जसे कि गोपालन, शेळी- मेंडी पालन, कुकुटपालन, रोप वाटिका, सेंद्रिय खत निर्मिती, गांडूळखत प्रकल्प इ प्रकल्पांची जवळून ओळख विद्यार्थाना करून दिली जाते, तसेच शेतीवर आधारित उद्योग उदा- साखर कारखाना, दूध डेअरी प्रकल्प , गुऱ्हाळ, रेशीम उदयोग, सूतगिरणी या ठिकाणी शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून भेटी आयोजित केल्या जातात, व विद्यार्थाना साखर , गुळ, इ कसे बनविले जाते याची माहिती मिळते व जवळून पाहावयास मिळतात त्याच बरोबर गड किल्ले, महाराष्ट्र व इतर राज्यातील प्रेक्षणीय स्थळे, रिसॉर्ट , वॉटर पार्क, या ठिकाणी देखील सहलींचे आयोजन करण्यात येते. देशमुख एज्यूकेशनल टूर्स मार्फत कॉलेजच्या विदयार्थ्यांसाठी विविध ठिकाणी इंडस्ट्रियल व्हिझिट आयोजित केल्या जातात या मध्ये कृषी वर आधारित इंडस्ट्री , ऑटोमोबाईल इंडस्ट्री, कापड इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, औषध निर्माण कंपनी, इ अनेक ठिकाणी सहलींचे आयोजन केले जाते. कार्पोरेट कंपनीच्या देखील सहली देशमुख एज्यूकेशनल टूर्स च्या मार्फत कृषी पर्यटन केंद्र, रिसॉर्ट, वॉटर पार्क, प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी आयोजित केले जातात. कॅर्पोरेट कंपनीचे एक दिवसीय व निवासी प्रशिक्षण देखील आयोजित केले जातात. हुरडा पार्टी, काजवा मोहत्सव, द्राक्ष मोहत्सव, वाईन पर्यटन, रान भाजी मोहत्सव, बीच पर्यटन, धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन सहली, ग्रामीण पर्यटन सहली, निसर्ग पर्यटन सहली, शैक्षणिक पर्यटन सहली असे विविध सहलींचे आयोजन देशमुख एज्यूकेशनल टूर्स मार्फत करण्यात येते. या सर्व सहलींचे आयोजन करत असताना गरजेनुसार वाहन व्यवस्था, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, सहल मार्गदर्शक, टूर गाईड देखील उपलब्ध करून दिले जातात .